पोलीस स्टेशन कुही हद्दीत दारू तस्करावर कुही पोलीसांची धडक कारवाई
कुही :- पोलीस स्टेशन कुही हद्दीतील चापेगडी परीसरात दारूची अवैध्य वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती कुही पोलीसांना मिळाल्याने दिनांक 06/06/2024 रोजी रात्री 21.36 वा. पोलीस स्टेशन कुही येथील अधिकारी व स्टॉफसह वरीष्ठांना माहिती देवून दिपक अग्रवाल (भापोसे), पोलीस निरीक्षक कुही यांचे नेतृत्वात चाफेगडी शिवारात जावून पेट्रोलींग करीत असता इसम नामे राजकुमार गरीबा बिरबल हा आपले मोटारसायकलने येतांना दिसला. त्याचे मोटारसायकलवर एक पांढऱ्या रंगाची प्लॉस्टिक चुंगडी दिसली. त्याची झडती घेतली असता प्लॉस्टिक चुंगडीमध्ये प्रिमियम नं. 1 ची 90 एम.एल. चे 200 निपा व काळया व निळया रंगाचे दोन कापडी पिशविमध्ये प्रिमियम नं. 1 ची 180 एम.एल. चे 96 निपा मिळुन आले. करीता मोटारसायकल क्र. एम.एच. 49 बी.ई. 1955 किंमत अंदाजे 70,000 रू. व 90 एम.एल. चे 200 निपा किंमती 7,000रू. व 180 एम.एल. चे 96 निपा किंमती 6,720 रू. असा एकुण किंमती 83,720 रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढिल कार्यवाही करण्यात आली.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार , अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ , उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. दिपक अग्रवाल (भापोसे), पोउपनि हरिहर सोनकुसरे, पो.हवा. चांगदेव कुथे, पोअं. रविन्द्र मारबदे, पोअं. आशिष खंडाईत यांचे पथकाने केली.