गुरु शिष्य परंपरा, स्नेह मिलन मेळावा शाहिरी गायनाने संपन्न
कुही :गुरु पूजा व गुरू शिष्य परंपरा,स्नेह मिलन मेळावा शाहिरी गायनाने संपन्न झाला.हा कार्यक्रम बुधवारी कुही येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार राजू पारवे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील अनेक लोककला लोप पावत आहे.या लोककला जपण्यासाठी गावखेड्यातील शेकडो तरुण शाहीर प्रयत्नरत आहेत.या कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक शाहिरांनी आपला आविष्कार सादर करून प्रेक्षकांचे मने जिंकलीत.सध्या आपल्या पारंपारिक लोककला लोप पावत असून त्या कलेला जिवंत ठेवण्याचे काम तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या ग्रा.प.मध्ये शिपाई पदावर कार्यरत शाहीर कालीचरण शेंडे हे सतत करीत आहे.आज त्यांच्याच कल्पकेतून शेकडो शाहिरी कलावंतांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी व लोककला जोपासण्यासाठी शासनाकडून मानधन मिळवून दिले. त्यामुळे आज लोककला जिवंत असल्याचे दिसून येत आहे.या कार्यक्रमाचे आयोजन ऑरेंज सिटी बहु संस्था विहीरगाव नागपूर,सम्यक सांस्कृतिक लोककला निकेतन परसाड,शाहिरी लोककला मंडळ भोजापुर कुही, कोहिनुर बहुउद्देशीय सांस्कृतिक लोककला निकेतन पारडी, हिरकन्या सांस्कृतिक कला मंडळ खरसोली,साई सर्वांगीण ग्रामीण विकास संस्था कुही,मानसी सांस्कृतिक कला मंडळ मुसळगाव आदी संस्थेच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय गुरु शिष्य परंपरा मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी आमदार राजूभाऊ पारवे,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप घुमडवार,निखिल खराबे, कैलास थोटे, संजय अतकरी,डॉ आनंद खडसे,शाहीर निनाद बागडे,गंगाधर शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी नागपूर,भंडारा,वर्धा,गडचिरोली, चंद्रपूर या पूर्व चैदर्भीय जिल्ह्यातून अनेक नामवंत कलावंतांनी आपली हजेरी लावली. महिलांनी आपल्या गीत गायनातून जनजागृती करण्याचे काम केले.यात स्वच्छ भारत अभियान,’बेटी पढाव,बेटी पढाव’स्त्री भ्रूण हत्या थांबविणे,दारूबंदी अशा अनेक ज्वलंत विषयावर गीत सादर करून प्रेक्षकांचे मने रिझविली. शाहीर भगवान वानखेडे,निशान सुखदेवे,सूरज नवघरे,बादल खांडेकर,महेश शेंडे,मंगेश शेंडे,माधुरी पाटील,रोमदेव शेबे, विजय बावणे,साहिल शेंडे,मानसी शेंडे व शशिकला खडसे अशा युवा कलावंतांनी गुरु शिष्य पावन पर्वावर आपली कला सादर केली सर्व कलावांताचे आभार नलू शेंडे यांनी मानले.