गाईला वाचवताना शिवशाहीचा भीषण अपघात ; अपघातात कुही तालुक्यातील युवकाचा मृत्यू

गाईला वाचवताना शिवशाहीचा भीषण अपघात ; अपघातात कुही तालुक्यातील युवकाचा मृत्यू

 

अमरावती :- अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला आहे. अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा अपघात झाला. महामार्गावर आलेल्या गाईला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे हा अपघात झाला. यावेळी गाडीमध्ये एकूण 28 प्रवासी होते. या अपघातामध्ये कुही तालुक्यातील सावळी येथील  एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अमरावती-नागपूर महामार्गावर आज एका शिवशाही बसचा अपघात झाला. हा अपघात सकाळच्या सुमारास झाला. अपघाताची भीषणता अधिक होती. यामुळे महामार्गावरुन बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यामुळे बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. आदित्य उर्फ अक्षय लीलाधर इंगळे (वय-२३) रा.सावळी, ता.कुही असे मृत प्रवाशाचे नाव असून अक्षय हा एका एग्रो कंपनीत काम करत होता. व कंपनीच्या मिटींग निमित्य अकोला येथे जात होता.  ही बस नागपूरहून अकोल्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी अमरावती-नागपूर महामार्गावर क्रमांक 6 वर एक गाय बसच्या मध्ये आली. यावेळी बस चालकाने गाईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.

अमरावती-नागपूर महामार्गावर या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यातील जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवशाही बसच्या चालकाने अपघाताचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, मी नागपूरहून अकोल्याकडे बस घेऊन जात होतो. त्यावेळी अचानक एक गाय महामार्गावर धावत आली. मी बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण माझी गाडी पलटी झाली. माझ्या बसमध्ये एकूण 35 प्रवाशी प्रवास करत होते. त्यातील 28 जण जखमी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया या अपघातग्रस्त झालेल्या शिवशाही बसच्या चालकाने दिली.