झाडात आसरा घेऊन उभा असलेल्या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू
विजांच्या कडकडाटाने तालुका हादरला
कुही :- (ngp news live) अचानक विजांचा कडकडात सुरु झाल्याने झाडात आश्रय घेणाऱ्या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. सतत दुसर्याही दिवशी विजेने मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवार पासून तालुक्यात विजगर्जनेच्या संख्येत वाढ झाली आहे. वीज कोसळल्याने शनिवारी कुही येथील एका महिलेसह सिल्ली येथील गाय मृत्यूमुखी पडली आहे. भगवान शंभरकर (वय ६०) रा. भीमनगर, कुही असे विजेने मृत शेतकर्याचे नाव आहे. शंभरकर यांचे भोजापूर शिवारातील आजनी-टाकळी फाट्यानजीक रोडलगत शेत आहे. शंभरकर हे कपासीवर फवारणी करण्याकरिता शेतात गेले होते. दुपारी 3.४५ च्या दरम्यान अचानक वीजगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यात त्यांनी शेतातीलच बाभळीच्या झाडाचा आश्रय घेतला. व त्याच झाडावर वीज कोसळून शेतकरी शंभरकर याचा मृत्यू झाला. काही वेळाने त्या रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांना झाडाखाली ते पडल्या असल्याचे दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता वीज कोसळून त्यांच्या मृत्यू झाल्याचे दिसून आले. सतत दोन दिवसांत दोघाचा वीज कोसळून मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.