टायर फुटल्याने टाटा ४०७ उलटला ; 10 जन किरकोळ जखमी

टायर फुटल्याने टाटा ४०७ उलटला 

10 जन किरकोळ जखमी

 

कुही :- कुही पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या उमरेड-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंप जवळ आठवडी बाजारात फरसाण विक्रीचा माल घेऊन जाणार्या  टाटा ४०७ ट्रकचा मागील टायर फुटल्याने ट्रक उलटून झालेल्या अपघातात 10 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

सोमवारी (दि.09) ला नागपूर वरून उमरेडला जाणारा टाटा 407 वाहनाचा रिलायन्स पेट्रोलपंप नजीक टायर फुटल्याने  वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटत गाडी उलटली. सोमवारी उमरेडचा आठवडी बाजार असल्याने नागपूर येथून फरसाण संबंधी माल घेऊन बाजारात जात असताना नागपूर – उमरेड मार्गावर रिलायंस पेट्रोलपंप नजीक हा अपघात झाला. यात गाडीतील 10 जण किरकोळ जखमी झाले असून अपघात होताच गाडी ड्रायवर पसार झाला आहे. जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णवाहिकेने नागपूर येथे पाठविले असून निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे गाडी चालकाविरुद्ध कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.