पोलीस नागरिकांच्या सतर्कतेने बँक फोडीचा डाव फसला
आरोपी पसार
कुही :- पोलीस स्टेशन कुही हद्दीतील पाचगाव येथे दि. नागपूर डीस्ट्रीक्ट सेन्ट्रल को-ऑफ. बँकेत मध्यरात्री बँकफोडीचा चोरट्यांचा नागरिक व पोलिसांच्या सतर्क ते मुळे मोठा अनर्थ टळला असून आरोपी घटना स्थळावरून पसार झाले आहे.
(दि.१९ ) मध्यरात्री 2.45 वाजताच्या सुमारास मौजा पाचगाव येथे येळणे यांच्या घरासमोर एक चारचाकी वाहनातून 4 अज्ञात इसम हातात रॉड घेऊन फिरत असल्याची माहिती गावातील काही नागरिकांनी कुही पोलिसांना दिली. माहिती मिळताच पेट्रोलिंग वर असलेले कुही पोलीस स्टेशन चे पाचगाव चौकी येथील अंमलदार तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नागरिकांसमवेत चारचाकी वाहन ताब्यात घेऊन आजूबाजूला पाहणी केली असता नजीकच चोरांसमवेत असलेला विधीसंघर्ष ग्रस्त बालक दिसून आला. पुढे आणखी समोर जाऊन पाहणी केली असता नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक चे समोरील कुलूप तुटलेले दिसल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी बँक मधील गार्ड तसेच बँक मॅनेजरला बोलावून बँकची पाहणी केली असता बँकचे लॉक तोडून कॅशियर रूम मधील लाकडी अलमारी तोडून त्यातून चोरट्यांनी लोखंडी तिजोरी बाहेर काढल्याचे दिसून आले. वेळीच पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोर चोरी न करताच पळून गेले. पोलिसांनी पकडलेल्या विधीसंघर्ष ग्रस्त बालकाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने फरार झालेल्या बाकी साथीदारांचे नाव सांगितले आहे. विशेष म्हणजे बँक फोडीसाठी चोरट्यांनी वापरलेली चारचाकी वाहनाची माहिती काढली असता कार सुद्धा चोरीची असून गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेली असून कार चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समजले . कारची मूळ नंबर प्लेट बदलवून कारचा चोरीसाठी वापर करत असल्याचे दिसून आले