विहिरीत डोकावताना तोल गेल्याने मुलासमोर आईचा विहिरीत बुडून मृत्यू ; कुही तालुक्यातील घटना

विहिरीत डोकावताना तोल गेल्याने मुलासमोर आईचा विहिरीत बुडून मृत्यू 

कुही तालुक्यातील घटना

कुही :- तालुक्यातील मौजा टाकळी(कुजबा) येथे शेतशिवारात ओलीत करताना मोटारपंप बंद पडल्याने दुरुस्ती करण्याच्या कारणावरून मुलगा विहिरीत उतरला असताना विहरीत मुलाकडे डोकावून पाहत असताना अचानक तोल गेल्याने आईचा विहरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

 

ही घटना आज दि.३१ डिसेंबरला दु.१:३० वाजताच्या दरम्यान टाकळी (कुजबा) ता.कुही येथे घडली. मृतक महिलेचे नाव मिरा दादाराव भोयर (वय ४५) असे आहे.घटनेच्या दिवशी फिर्यादी मुलगा लोकेश दादाराव भोयर(वय २५) हा मोटारपंप बंद पडल्याने तो काढण्यासाठी विहिरीत उतरला होता.मोटारपंप काढत असताना त्याची आई मीरा ही विहिरीच्या तोंडीवर उभी राहून विहिरीत डोकावून पाहत होती. विहिरीत डोकावत असताना तिचा अचानक तोल गेल्याने ती विहिरीत पडली. व पाण्यात बुडून मरण पावली.अशी तक्रार फिर्यादी मुलगा लोकेश याने वेलतुर पोलिसांना दिली. यासंदर्भात वेलतुर पोलीसांनी गुन्हा क्रमांक २९/२४ कलम १९४ बीएनएस प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार मनीराम भुरे व संदीप रामटेके करीत आहे.