कूही तालुक्यात पी. एम. किसान सन्मान निधी साठी कॅम्प चे आयोजन ; कॅम्प मध्ये लाभार्थी अपात्र लाभार्थ्यांना करण्यात येणार पात्र

कूही तालुक्यात पी. एम. किसान सन्मान निधी साठी कॅम्प चे आयोजन 

कॅम्प मध्ये लाभार्थी अपात्र लाभार्थ्यांना करण्यात येणार पात्र

कुही :- तालुक्यात पी. एम. किसान सन्मान निधी साठी एकूण 27634 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी 1607 लाभार्थी untraceble, E-Kyc साठी 988 लाभार्थी व आधार बँक खात्याशी लिंक नसलेले 927 लाभार्थी प्रलंबित आहेत. Untraceble साठी 1607 लाभार्थी आहेत म्हणजेच सदर लाभार्थी यांनी ज्या गावात नोंदणी केली आहे परंतु त्या गावचे रहिवासी नाहीत किंवा ते लाभार्थी बाहेरगावी राहतात ज्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा कृषि अधिकारी/कृषी विभागाचे कर्मचारी यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे किंवा कुठल्यातरी इतर कारणामुळे पी एम किसान पोर्टल वरुन अपात्र करण्यात आलेले आहेत.

सदर लाभार्थी साठी दिनांक 15, 16, 17 जानेवारी 2025 या तारखेला ग्राम पंचायत निहाय कॅम्प चे आयोजन कऱण्यात आलेले आहे. सदर कॅम्प मध्ये त्या लाभार्थ्यांना पात्र करण्यात येणार आहे. सदर कॅम्प च्या पूर्वतयारी नुसार दि. 9, 10, 11, 12 जानेवारी 2025 रोजी सर्व ग्राम पंचायत मध्ये ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांची Untraceble यादी, E-Kyc प्रलंबित, आधार बँक खात्याशी लिंक नसलेले लाभार्थी यांची यादी नोटीस बोर्ड वर जाहीर करण्यात आलेली आहे. सोबतच सर्व पदाधिकारी, CSC केंद्र व इतर विभागाच्या अधिकारी यांना सुद्धा सदर यादी देण्यात आली आहे जेणेकरून सदर प्रलंबित लाभार्थ्यांपर्यंत वेळेच्या आत पोहोचता येईल. जे लाभार्थी सदर कॅम्प च्या दिवशी उपस्थित राहणार नाही किंवा ज्यांच्याबद्दल कुठलीही माहिती प्राप्त न झाल्यास सदर लाभार्थी यांना कायमस्वरूपी अपात्र करण्यात येईल. तसेच सदर कॅम्प च्या दिवशी सन 2022-2023 व 2023-2024 मधील लाभार्थींचे भौतिक तपासणी VNO ॲप मधून करण्यात येणार आहे. तसेच कुही तालुक्यातील E-Kyc साठी प्रलंबित असलेले व आधार बँक खात्याशी लिंक नसलेले लाभार्थी शेतकरी यांना सुद्धा मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

  • कुही तालुक्यातील पी. एम. किसान सन्मान निधी योजनेसाठी आवेदन केलेल्या सर्व लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की आपण दिनांक 15, 16, 17 जानेवारी 2025 या दिवशी कॅम्प ला उपस्थित राहून आपले प्रलंबित असलेले सर्व कामे पूर्ण करून घ्यावेत जेणेकरून सर्व पात्र लाभार्थी यांना पी.एम. किसान सन्मान निधी चे हप्ते नियोजित वेळेत त्यांच्या खात्यात जमा करता येतील. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री. राजेश जारोंडे यांनी केले आहे. तरी अधिकच्या माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा. सोबतच दिनांक 15, 16, 17 जानेवारी 2025 रोजी आयोजित कॅम्प ची यादी दिलेली आहे.