रानडुकराच्या धडकेत गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू ; सिल्ली  नजीक घटना

रानडुकराच्या धडकेत गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

 सिल्ली  नजीक घटना

 कुही:-  दुचाकीने कुही वरून गावी परत जात असताना रस्त्यात अचानक रानडुक्कर आडवे येऊन दुचाकीला धडक दिल्याने मामेभाचे गंभीर जखमी झाले. यातील मामाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.

कोटीराम शंकर जिभकाटे (वय-51)  रा. गुडेगाव, ता.पवनी ,जि. भंडारा असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.  मृतक हा दि.२६ जूनला ६.३० च्या सुमारास आपला भाचा नितेश मदन हटवार याचे दुचाकी क्रमांक एमएच 36 एके ०६२९ या मोटरसायकलने कुही वरून सिल्ली मार्गे गावी परत जात असताना  मुलांचे शासकीय वसतिगृह नजीक रोडवर अचानक रानडुक्कर आडवे येऊन दुचाकीला  जबर  धडक दिल्याने दुचाकी वरील दोघेही मामेभाचे खाली पडून गंभीर जखमी झाले. यात कोटीराम यांचे नाका-तोंडातून रक्त गेला. जखमींना प्राथमिक  उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करून नंतर पुढील उपचारासाठी एम्स येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान  एम्स हॉस्पिटल नागपूर येथे कोटीराम यांचा मृत्यू झाला असून अपघाताचे स्थळ कुही पोलीस स्टेशन असल्याने कुही पोलीस स्टेशन येथे मर्ग  दाखल करण्यात आला आहे.