कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला ; महिला गंभीर जखमी

कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला 

महिला गंभीर जखमी

नागपूर :- भिवापूर तालुक्यातील बेसूर येथून तीन किमी अंतरावर असलेल्या खंडाळझरी शेतशिवारात कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केल्याची घटना आज ३१ डिसेंबर मंगळवारला दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.या घटनेमुळे मजूर व शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव इंदिराबाई तुळशिराम मसराम (वय ४५) असून ती खंडाळझरी येथील रहिवासी आहे. इंदिराबाई ही काही महिलांना सोबत घेऊन कापूस काढत असताना अचानक वाघाने मागून तिच्यावर हल्ला केला.अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ती घाबरली व तिने आरडाओरड केली. जवळच असलेल्या इंदिराबाईच्या पुतण्याने तिच्याकडे धाव घेतली .व आरडाओरड करु लागला. आरडाओरडा सुरु असल्याने  वाघाने तिथून पळ काढला .परंतू वाघाच्या  हल्ल्यात इंदिराबाई हि गंभीर जखमी झाली असून तिला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय उमरेड येथे दाखल करण्यात आले. तिच्यावर वैधकीय अधिकारी डॉ. जुनघरे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला सायंकाळी ४ वाजता नागपूर मेडिकल कॉलेज येथे पुढील उपचारासाठी रेफर आले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.