नागपूर हादरलं! भवानीनगरमध्ये दोन सख्या भावांचा खून
नागपूर : नागपुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरातील भवानीनगरमध्ये काल (30 डिसेंबर) रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण परसरले आहे. या हत्येच्या घटनेत दोन सख्या भावांची हत्या करण्यात आली आहे. तहसील पोलिस ठाण्यांतर्गत दोन भावांवर दूरच्या नातेवाईकाने चाकूने वार करून हत्या केली. व्यावसायिक पैशाच्या व्यवहाराच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. या हत्येतील चार आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे. खुनाची ही घटना गांधीबाग बागेजवळ रस्त्याच्या मधोमध रविवारी रात्री 10.45 च्या सुमारास घडली.
रवी राजेश राठोड (35) आणि दीपक राजेश राठोड (40, रा. प्लॉट क्रमांक 179, भवानीनगर पार्डी) या दोन्ही भावांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा मुख्य सूत्रधार बदन सिंग उर्फ मामा रामगोपाल राठोड (45), त्याचा मुलगा अभिषेक राठोड, मेहुणा मनोज राठोड आणि पुतण्या विवेक राठोड यांना अटक केली आहे. बदन सिंगचा मुलगा सोनू मात्र फरार आहे.

वर्षभरापासून वैर सुरू होते
आरोपींचे रवी आणि राजेश राठोड बंधूंसोबत गेल्या एक वर्षापासून अंतर्गत वाद सुरू होते. राठोड बंधू वाड्यात बांगड्या विकायचे. बदनसिंग आणि त्यांच्या मुलांचे हंसापुरी येथे बांगड्यांचे दुकान आहे. रवी राठोड याने वर्षभरापूर्वी अभिषेककडून दुचाकी मिळवून देण्याच्या नावाखाली 20 हजार रुपये घेतले होते. बाईक न मिळाल्याने अभिषेक पैसे परत मागत होता मात्र तो लांबवत होता. यावरून त्यांच्यात वाद झाला. रवीने अभिषेकच्या दुकानातून 10 हजार रुपये किमतीची बांगड्याही उधार घेतल्या होत्या.
सहा महिन्यांपूर्वीही झाला होता हल्ला
आरोपीच्या दुकानावर 6 महिन्यांपूर्वी हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात हंसापुरीतील तरुणांचा सहभाग होता. रवीने हल्लेखोरांना मदत केली होती. रवीच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचा संशय आरोपींनी व्यक्त केला. राठोड बंधू गांधीबाग आणि हंसापुरीत सक्रिय होते. आरोपींना त्याच्या वर्चस्वाची भीती वाटत होती. राठोड बंधूंनी रविवारी सकाळी आरोपींना बेदम मारहाण केली होती. यानंतर आरोपींनी बदला घेण्याचा विचार केला. राठोड बंधू आणि त्यांचे सहकारी रात्री यादगार चौकात भेटणार असल्याची माहिती आरोपींना कळाली. त्यानुसार ते यादगार चौकात राठोड बंधूंची वाट पाहत होते. राठोड बंधू येत असल्याची माहिती मिळताच बदनसिंग आपल्या लोकांसोबत तिथे आला. तिथेही त्यांच्यात वाद झाला.
दोन्ही भावांवर चाकूने वार
दीपकच्या आव्हानामुळे बदनने आपल्या मुलांनाही बोलावले. ते येताच त्याने दीपकवर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. या हत्यात रवी गंभीर जखली झाला. त्याच दरम्यान, रवी आणि त्याचा मित्र शुभम बारस्कर तिथे पोहोचले. आरोपींनी रवीचा जागीच खून केला. दीपकही गंभीर जखमी झाला. हे पाहून शुभम धावू लागला. आरोपीही शस्त्रे घेऊन त्याच्या मागे धावले.दीपकला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या फिर्यादीवरून तहसील पोलिसांनी आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तहसील पोलीस आता बदनसिंगचा मुलगा सोनू याचा शोध घेत होते. अटक आरोपींना पोलीस मंगळवारी न्यायालयात हजर करणार आहेत.



