घरफोडी करत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध वेलतूर पोलिसांत गुन्हा दाखल
वेलतूर :– तालुक्यातील पिपरी मुंजे (पुनर्वसन) येथील घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याच्या दागिन्यांसह नगदी रोकड लंपास केली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारी वरून वेलतूर पोलिसांत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी धनराज रघुनाथ भोयर (वय-५५) रा.पिपरी मुंजे (पुनर्वसन) ता.कुही यांनी दिलेल्या माहितीनुसार ते त्यांच्या परिवारासह पिपरी येथे राहत असून रक्षाबंधन निमित्य त्यांचा मुलगा व सून हे मुलाच्या सासुरवाडीला गेले होते. फिर्यादी बुधवारी (दि.२१ ऑगस्ट) रात्री 9.३० च्या सुमारास जेवण करून झोपी गेले. व मध्यरात्री 3.३० च्या सुमारास तहान लागल्याने उठून पाणी पिण्यास गेले असता बेडरूमचा दरवाजा उघडत नसून आतून लागल्याचे दिसून आले. त्यांनी घराबाहेर निघत मागून जाऊन पहिले असता स्वयंपाक खोलीचा मागचा दार उघडा दिसून आला. परत जाऊन पत्नीला उठवून स्वयंपाक खोलीत जाऊन पाहणी केली व तेथून बेडरूम मध्ये पहिले असता तेथील लाकडी आलमारीतील कपडे अस्ताव्यस्त फेकून दिसून आले. फिर्यादी यांच्या पत्नीने आलमारीत ठेवलेले दागिने पहिले असता एक 4 ग्रामची व एक ५ ग्रामची सोन्याची अंगठी, 4 ग्राम सोन्याचे मनी व डोरले, 6 ग्राम सोन्याचे कर्णफुल , 10 हजार नगदी रोकड आदी दिसून आले नाही. तसेच बाजूला असलेल्या मुलाचा खोलीचाही दरवाजा उघडा दिसून आला. व त्याच्या खोलीतील लोखंडी कपाटाचे दार उघडे दिसून आले. व कपडे फेकले व अस्ताव्यस्त दिसून आले. फिर्यादी यांनी मुलाला गावावरून परत बोलवून मुलाने त्याच्या खोलीतील कपाटात पहिले असता त्यातील 2 ग्राम सोन्याचे मनी, 1 ग्राम सोन्याचे ताईत, 4 ग्राम सोन्याची अंगठी, 2.5 ग्रामची नथ कपाटात दिसून आले नाही. अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत नगदी रकमेसह सोन्याचे दागिने असा ६५ हजार रुपयांचा माल लंपास केला. फिर्यादी धनराज रघुनाथ भोयर यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याचा अधिक तपास वेलतूरचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेलतूर पोलीस करत आहेत.